गृप ग्रामपंचायत वार्षी (हनुमंत पाडा) ता.देवळा, जि.नाशिक

ग्रामपंचायत बद्दल संक्षिप्त माहिती (इतिहास, वैशिष्ट्ये):

ग्रामपंचायत हनुमंतपाडा

वार्षी (हनुमंतपाडा)  हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १८१४ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २, अंगणवाडी केंद्रे ४ ,माध्यमिक विद्यालय ० ,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ० व व्यायामशाळा १ अशी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच सप्तशृंगी माता मंदिर व हनुमान मंदिर आणि दुर्गा माता मंदिर  हे प्रसिद्ध देवस्थान आहे. सामुदायिक सभामंडप, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून अधिकतर  कांदा, बाजरी, गहू व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. कांदा व मका  या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.
वार्षी (हनुमंतपाडा)  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत शेकडो घरांना लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वार्षी (हनुमंतपाडा) गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF+) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे ज्यात गावाला अटल भूजल योजनेत जिल्हास्तरीय स्थान पटकावले. 
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ७ सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

गावा बद्दल

गावाचे भौगोलिक स्थान

महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात वार्षी (हनुमंतपाडा) हे गाव आहे. हे उत्तर महाराष्ट्र प्रदेशातील आहे. ते नाशिक विभागातील आहे. हे जिल्हा मुख्यालय नाशिकपासून उत्तरेकडे ७० किमी अंतरावर आहे. देवळा पासून १७ KM. राज्याची राजधानी मुंबईपासून २४१ किमी वार्षी (हनुमंतपाडा) पिन कोड 423102 आहे आणि पोस्टल मुख्य कार्यालय देवळा आहे.
शेरी (३ KM), वाजगाव (व) (८ KM), कनकापूर (४ KM), खर्डे (५ KM), रामेश्वर (१२ KM) ही वार्षी (हनुमंतपाडा) जवळची गावे आहेत. वार्षी (हनुमंतपाडा) दक्षिणेस चांदवड तालुका, पश्चिमेस कळवण तालुका, उत्तरेस बागलाण तालुका, दक्षिणेस निफाड तालुका आहे.

लोकजीवन

वार्षी (हनुमंतपाडा) हे गाव साध्या, कष्टप्रधान आणि पारंपरिक जीवन शैलीसाठी ओळखले जाते. शेती हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय असून कांदा, बाजरी, मका आणि विविध हंगामी भाज्या यांची लागवड येथे मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतीव्यतिरिक्त काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन तसेच लघुउद्योग या क्षेत्रांतही कार्यरत आहेत. गावात सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा दृढपणे जपल्या जातात. वर्षभर साजरे होणारे सण-उत्सव, ग्रामदैवतांची पूजाअर्चा तसेच आठवडी बाजार हे गावाच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. आदिवासी परंपरा आणि संस्कृतीही येथे तितक्याच जपल्या जातात. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र यांसह स्थानिक देवतांच्या जत्रांना विशेष महत्त्व आहे. येथील लोक मेहनती, मदत करणारे आणि ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांना आचरणात आणणारे आहेत. ग्रामविकासात महिलांचा सहभाग स्वयंसाहाय्य गटांमुळे प्रकर्षाने जाणवतो. तरुण पिढी शिक्षण, खेळ व रोजगाराच्या संधी शोधून प्रगतीकडे वाटचाल करत आहे. वार्षी (हनुमंतपाडा) च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण व आदिवासी संस्कृतीसोबतच आधुनिकतेचा स्पर्शही आढळतो, ज्यामुळे गाव विकास आणि एकतेचा उत्तम संगम घडवते.
लोकसंख्या
1814
कुटुंबसंख्या
311