गृप ग्रामपंचायत वार्षी (हनुमंत पाडा) ता.देवळा, जि.नाशिक

गावातील उत्सव आणि कार्यक्रम

Home

ग्रामीणरुग्णालय / आरोग्यसुविधामाहिती

कार्यक्रमाचेनाव दिनांक स्थळ आयोजनकरणारीसंस्था

धार्मिकस्थळे

विखार पहाड

गोरक्षनाथ मंदिर आणि महादेव मंदिर

विखारा…. _ पहाड
सह्याद्री पर्वत रांगेतील सातमाळ पर्वत. यांतील उत्तरेकडून पूर्वेकडे पसरलेली सातपुडा पर्वतरांग यातील एक पहाड म्हणजेच, देवळा तालुक्यातील विखारा पहाड. निसर्गाने नटलेले सौंदर्याचं मन मोहून टाकणारे हे ठिकाण. येथे गोरक्षनाथांचे समाधी आहे. नाथ संप्रदायातील हे एक महत्त्वाचे नाथ. या नवनाथांनी जगभर भ्रमंती केली. ठीक ठिकाणी मठ उभारले. जनकल्याणाच्या अनेक गोष्टी यांनी करून ठेवले आहेत. या पहाडावर ती गेल्यावर निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता येतो. पंचमी, एकादशी ला येथे दर्शनासाठी मोठा जनसागर गोळा होतो. खान्देशातून येण्यासाठी एक मार्ग व नाशिक चांदवड वरून येण्यासाठी एक मार्ग असे मार्ग आहेत. वर्षातून एकदा येथे मोठी यात्रा भरली जाते. या डोंगराच्या पोटाला अनेक वनौषधी वनस्पती व झाडे आहेत.
या पहाडा पासून वीस किलोमीटर अंतरावर श्याम चे छोटेसे गाव आहे. तेथून या पहाडाचे सुंदर दृश्य छोट्या डोंगरान वरून दिसते. हे निसर्गाचे सौंदर्य बघण्यासाठी श्याम आपल्या शहरातील मित्र परिवार सोबत या पहाडावर ती फिरायला गेला. मनसोक्त निसर्गाचा आनंद घेत, सेल्फी काढत, मंदिरा पर्यंत पोहोचले. नंतर तिथे जेवण वगैरे करून पुन्हा नवनवीन झाडे- वेली यांची माहिती गोळा करू लागले. काही तर अशाच निसर्गाच्या सानिध्यात आपला संसार थाटावा असे मत व्यक्त करत होते. त्यांनी या आधी इतके सुंदर दृश्य शहरात कधीच बघितले नव्हते. इतके सुंदर दृश्य, मोकळी स्वच्छ हवा, निर्मळ पाणी.. जनावरे देखील येथे मुक्तपणे संचार करीत होते.
दर्शनाला आलेले भाविक कधीच निराश होऊन परत नाही इथून गेलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत असतो. श्याम आणि त्याच्या मित्रांना एक अविस्मरणीय भेट त्यांनी दिली.
या पर्वत रांगेने अनेक ऐतिहासिक वारसा स्थळे जतन करून ठेवलेली आहेत. विखारा पहाड च्या आपण जसे पश्चिमेकडे जाऊ त्याच्याशेजारीच भव्य असा धोडप किल्ला आहे. त्याच्या पायथ्याशी हट्टी हे निसर्गाने नटलेले छोटसं गाव आहे. तिथला खवा हा नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या किल्ल्याचा इतिहास गौरवशाली आहे. त्याच्या पश्चिमेस मार्तंड रुषी चे पहाड आहे. या पहाडाला ही विशेष इतिहास आहे. त्याच्या समोरचा सप्तश्रृंगी गड तर सर्वश्रुत आहे.

घोडप किल्ला

सप्तशृंगी माता मंदिर

धोडप किल्ला हा नाशिक जिल्ह्यात असलेला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि उंच किल्ला आहे. हा किल्ला त्याच्या शिवलिंगासारख्या दिसणाऱ्या माथ्यामुळे ओळखला जातो आणि अनेक गिर्यारोहकांसाठी (ट्रेकर्ससाठी) प्रसिद्ध आहे. हा एक ऐतिहासिक किल्ला असून, त्याचे बांधकाम विविध काळात nizams, mughals, आणि marathas यांच्या अधिपत्याखाली झाले होते. 
भौगोलिक स्थान आणि ओळख
स्थान: 
धोडप किल्ला नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यात स्थित आहे. 
रचना: 
सह्याद्रीच्या डोंगररांगेत असलेला हा किल्ला त्याच्या शिवलिंगासारख्या वैशिष्ट्यपूर्ण माथ्यामुळे दूरूनच ओळखता येतो. 
उंची: 
महाराष्ट्रातील दुसरा सर्वात उंच किल्ला म्हणून धोडप ओळखला जातो. 
ऐतिहासिक महत्त्व 
निजामशाही आणि मुघल काळ: 
हा किल्ला १५५० मध्ये nizams च्या ताब्यात होता आणि नंतर १६३५ मध्ये तो मुघलांच्या अधिपत्याखाली आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रयत्न: 
१६७२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात त्यांना यश आले नाही.
पेशवेकालीन संघर्ष: 
१७७२ मध्ये राघोबा दादा यांनी माधवराव पेशव्यांविरुद्ध बंड पुकारले होते, तेव्हा त्यांनी धोडप किल्ल्याला आश्रय घेतला होता. येथेच राघोबा दादांचा पराभव झाला होता.
सध्याचे महत्त्व
गिर्यारोहकांसाठी आकर्षण: 
हा किल्ला गिर्यारोहकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे, जिथे ट्रेकर्स डोंगरावर चढून किल्ला अनुभवतात आणि शिखरावरून नाशिकचे सुंदर दृश्य पाहू शकतात. 
कठीण ट्रेक: 
धोडपचा ट्रेक मध्यम स्वरूपाचा अवघड मानला जातो आणि तो पूर्ण करण्यासाठी सुमारे ३ तास लागतात, अशी माहिती pune trekkers ने दिली आहे. 
निष्कर्ष
धोडप किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक गडच नाही, तर निसर्गरम्यता आणि ऐतिहासिक वारसा यांचा संगम असलेला एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.